प्रेमळ आणि तळमळीने अन् परिपूर्ण सेवा करणारे पुणे येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७५ वर्षे) !
प्रेमळ आणि तळमळीने अन् परिपूर्ण सेवा करणारे पुणे येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद सहस्रबुद्धे (वय ७५ वर्षे) !
१. सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (पत्नी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६८ वर्षे), पुणे
१ अ. निरपेक्ष प्रेम
१. ‘माझ्या यजमानांना (श्री. अरविंद सहस्रबुद्धे यांना) सर्व कुटुंबीय आणि सनातनच्या केवळ पुण्यातील साधकांविषयीच नव्हे, तर त्यांच्या सहवासात आलेल्या केरळपर्यंतच्या सर्व साधकांविषयी अतिशय प्रेम वाटते. यजमान त्या साधकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क करतात आणि त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांनाही त्यांच्या वाढदिवसाची आठवण करून देतात. तेव्हा त्या साधकाला झालेला आनंद पाहून यजमानांनाही पुष्कळ आनंद होतो.
२. त्यांची कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नसते. त्यांच्या मनात कोणाविषयी पूर्वग्रह, प्रतिक्रिया किंवा कटूता नाही. एखाद्या साधकाकडून चूक झाल्यास ते त्याला प्रेमाने समजावून सांगतात. त्यानंतर त्यांच्या मनात काहीच नसते.
१ आ. पत्नीला घरकामात साहाय्य करणे : यजमानांचे वय अधिक असूनही मला साहाय्य करण्यासाठी ते घरातील सर्व कामे करतात. घरातील कामे करतांना त्यांना कुठलाही न्यूनपणा वाटत नाही.
१ इ. त्यांना खाण्या-पिण्याची कुठलीही आवड-नावड नाही.
१ ई. स्थिरता : ते मनाने पुष्कळ स्थिर असतात. त्यांच्या हर्नियाच्या (टीप) झालेल्या मोठ्या शस्त्रकर्माच्या वेळी आणि नंतरही ते पुष्कळ स्थिर अन् शांत होते.
टीप – हर्निया (अंतर्गळ), म्हणजे अवयवांना त्यांच्या जागी स्थिर ठेवणारे स्नायू शिथिल होणे
१ उ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : यजमान प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून नामजपादी उपाय करतात. शस्त्रकर्माच्या वेळी रुग्णालयात त्यांच्या एका हाताला ‘सलाईन’ लावले असतांना ते दुसर्या हातात प्रार्थनेची वही धरून प्रार्थना वाचत असत.
१ ऊ. सेवेची तळमळ
१ ऊ १. सेवा समयमर्यादेत आणि भावपूर्ण करणे : मागील १५ वर्षांपासून ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अखंड करत आहेत. आतापर्यंत कोणालाही त्यांच्या सेवेचा पाठपुरावा घ्यावा लागला नाही. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला ही सेवा दिली आहे. मला ती वेळेत आणि अचूक करायला हवी’, असा त्यांचा भाव असतो. ते सर्व कृती वेळेत करतात. ‘ते सेवेशी एकरूप झाले आहेत’, असे मला वाटते. त्यांना स्वप्नेही साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेच्या संदर्भातील पडतात.
१ ऊ २. शस्त्रकर्मानंतर थकवा असतांनाही सेवा करणे : त्यांचे ‘हर्निया’चे शस्त्रकर्म झाल्यानंतरही थकवा असतांना ते बसून, तर कधी झोपून सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ‘मला काही येत नाही. सर्वकाही गुरुदेव करतात’, असा त्यांचा भाव असतो.
१ ए. जाणवलेले पालट
१ ए १. ‘पूर्वी काही प्रसंगांत यजमान प्रतिक्रियात्मक बोलायचे; पण या ६ – ७ मासांमध्ये त्यांचे प्रतिक्रियात्मक बोलणे पुष्कळ न्यून झाले आहे.
१ ए २. पूर्वी क्वचित् ते नातवंडांवर चिडचिडही करत असत. आता पूर्वीच्या तुलनेत ते शांत झाले आहेत.
१ ए ३. पूर्वी त्यांच्यावर आवरण आल्यासारखे वाटायचे; पण आता त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर शांत वाटून आनंद जाणवतो.
१ ए ४. अलीकडे यजमानांच्या बोलण्यात पुष्कळ नम्रता आणि प्रीती जाणवते.
१ ए ५. अंतर्मुख झाल्याचे जाणवणे : पूर्वी मी त्यांना त्यांची चूक सांगितली, तर ते ती चूक स्वीकारत नसत; पण आता ते चूक स्वीकारून माझी आणि सूक्ष्मातून गुरुदेवांची क्षमा मागतात. आता ते अंतर्मुख झाले आहेत.
१ ए ६. सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे : सेवा झाल्यानंतर ‘प्रार्थना आणि नामजप करणे’, असा यजमानांचा नित्यक्रमच झाला आहे. आता ‘ते सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात’, असे मला वाटते. ते मला म्हणतात, ‘‘आता माझ्या मनामध्ये ‘नामजप, प.पू. गुरुदेवांशी अनुसंधान आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता’, एवढेच आहे.’’
१ ऐ. अनुभूती : त्यांना घरात असलेल्या श्रीकृष्णाच्या मोठ्या चित्राच्या संदर्भात अनेक अनुभूती आल्या आहेत. त्यांना कधी श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरतांना दिसते, तर कधी श्रीकृष्णाच्या मुकुटातील मोरपीस हालतांना दिसते.’
२. सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), पुणे
२ अ. ‘काकांचे हसणे लहान बाळाप्रमाणे निरागस वाटते.
२ आ. संत आणि साधक यांचे आदरातिथ्य प्रेमाने करणे : पूर्वी काकांच्या घरी अनेक संत आणि साधक अनेक वेळा वास्तव्याला राहिले आहेत. काका-काकूंमधील प्रेमभावामुळे ते साधकाचे आदरातिथ्य पुष्कळ आपलेपणाने करत असत. आता ‘दोघांचे वय आणि शारीरिक मर्यादा यांमुळे पूर्वीच्या तुलनेत त्यांना शारीरिक सेवा जमत नाही’, याची त्यांना खंत वाटते.
२ इ. प्रांजळपणा : काकांकडून काही चूक झाली किंवा त्यांच्या मनात अपेक्षेचा विचार आल्यास ते प्रांजळपणे सांगतात.
२ ई. स्वीकारण्याची वृत्ती : काकांमधील काही स्वभावदोषांच्या संदर्भात त्यांना साहाय्य करण्याविषयी काकू मला नेहमी सांगतात. मला काकांना त्यांचे स्वभावदोष मोकळेपणाने सांगता येतात; कारण काका ते त्वरित स्वीकारतात आणि स्वतःत तसे पालट करतात.
२ उ. कर्तेपणा नसणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच सर्वकाही करवून घेतात’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात कर्तेपणा जाणवत नाही.
२ ऊ. जाणवलेले पालट
२ ऊ १. काका सतत आनंदी असतात. आता त्यांच्या चहर्यावर निराळे तेज जाणवते.
२ ऊ २. अपेक्षा उणावल्याचे जाणवणे : शस्त्रकर्माच्या वेळी रुग्णालयात असतांना ‘माझ्या समवेत पत्नीने किंवा अन्य कोणी सतत थांबावे’, अशी काकांची कोणतीही अपेक्षा नव्हती. पूर्वी त्यांना साधकांकडून काही प्रमाणात अपेक्षा असायच्या. आता ‘त्यांच्या अपेक्षा उणावल्या आहेत’, असे जाणवते.
माझ्या विवाहानंतर मी सिंहगड रस्ता (पुणे) येथे रहायला आल्यापासून ‘श्री. अरविंद सहस्रबुद्धे आणि सौ. मंगला सहस्रबुद्धे यांचे घर, म्हणजे साधकांना आध्यात्मिक स्तरावर आधार देणारे अन् साधनेत साहाय्य करणारे माहेरघरच आहे’, असे वाटते. माझ्यासह अनेक साधकांनी हे अनुभवले आहे. ‘गुरुदेवांनी आम्हाला असे आध्यात्मिक कुटुंब दिले’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
३. श्री. केतन पाटील, पुणे
अ. ‘काकांच्या बोलण्यातून मला शांततेची स्पंदने जाणवली.
आ. त्यांचे छायाचित्र काढत असतांना त्यांचा हसरा चेहरा पहातांना मला पुष्कळ आनंद जाणवला.’
४. सौ. स्नेहल केतन पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), पुणे
४ अ. स्वीकारण्याची वृत्ती : ‘काकांचे छायाचित्र काढतांना अनेक पालट करावे लागले. काकांनी ते सर्व पालट सहजतेने स्वीकारले. तेव्हा काका पुष्कळ स्थिर होते.
४ आ. देहबुद्धी न्यून झाली असल्याचे जाणवणे : सहस्रबुद्धेकाकूंशी बोलल्यावर ‘नुकतेच काकांचे ‘हर्निया’चे शस्त्रकर्म झाले आहे’, असे मला कळले. त्यांना अधिक वेळ बसता येत नसतांनाही छायाचित्र काढतांना त्यांनी एकदाही स्वतःच्या शारीरिक त्रासाविषयी सांगितले नाही. त्यातून ‘त्यांची देहबुद्धी न्यून झाली आहे’, असे मला जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २४.५.२०२२)
|