टिपू सुलतानचा पुतळा उभारल्यास तो उखडून टाकू ! – प्रमोद मुतालिक यांची चेतावणी

काँग्रेसचे आमदार तन्वीर सेठ यांच्या मागणीला विरोध

श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – काँग्रेस आमदार तन्वीर सेठ यांनी म्हैसुरू किंवा श्रीरंगपट्टणम् येथे क्रूरकर्मा टिपू सुलतानचा १०० फुटी पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. यावर श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांनी ‘टिपू सुलतानचा पुतळा उभारल्यास आम्हा तो उखडून टाकू. अयोध्येत बाबरीचा ढाचा जसा पाडण्यात आला, तसाच तो पुतळाही पाडला जाईल’, अशी चेतावणी दिली. ते येथील इदगाह मैदानावर कनकदास जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

श्री. मुतालिक पुढे म्हणाले की, टिपू हा धर्मांध राजा होता. त्याने हिंदूंची सहस्रो मंदिरे उद्ध्वस्त केली. कर्नाटकासाठी तो कलंक होता. म्हैसुरूच्या राजांचा अपमान होईल, असा पुतळा त्या शहरात उभारू नये. सरकारने टिपूच्या पुतळ्याचा विचार करू नये. त्यापेक्षा भारतीय तत्त्वज्ञ शिशुनाळ शरीफ आणि माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे पुतळे उभारावेत.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या एकातरी मुसलमान नेत्याने कधी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदी राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभारण्याची मागणी केली आहे का ?