गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे मदरशाच्या मुख्याध्यापकाकडून इयत्ता ६ वीतील मुलीवर बलात्कार
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील मदरशात इयत्ता ६ वीत शिकणार्या एका मुलीवर मुख्याध्यापक शहादत याने बलात्कार केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. अनेक दिवस मुलीसमवेत हा प्रकार चालू होता; मात्र ती घरच्यांना सांगू शकली नाही. मुलगी शांत राहू लागल्यावर कुटुंबियांनी विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. पालकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली असून पोलीस या प्रकरणी अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामदरशांमधील कुकृत्ये वारंवार उघड होत असतांना सरकार त्यांवर बंदी का घालत नाही ? |