पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकाचे नियंत्रण कक्षात स्थानांतर !
पोलाद व्यावसायिकाच्या चौकशीचे प्रकरण
पुणे – येथील एका पोलाद व्यावसायिकाची चौकशी चालू आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्याकडे होती. या प्रकरणाची चौकशी प्रामाणिक अधिकार्याकडून करण्यात यावी, अशी विनंती प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. चौकशीत काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्याने वजीर शेख यांच्याकडून अन्वेषण काढून घ्यावे, असे कडू यांनी पत्रात म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले. त्यानंतर पोलीस आयुक्त गुप्ता यांनी वजीर शेख यांचे पोलीस नियंत्रण कक्षात स्थानांतर करण्याचे आदेश दिले आहेत