चंद्रपूर येथे महापालिकेने ७ धोकादायक इमारती पाडल्या !
नागपूर – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १५ इमारती अतीधोकादायक वर्गातील आहेत. महापालिकेने विविध परिसरातील ७ अतीधोकादायक इमारती ११ नोव्हेंबर या दिवशी पाडल्या, तर उर्वरित सर्व धोकादायक इमारतींमध्ये रहाणार्या नागरिकांना महापालिकेच्या वतीने घर सोडून त्वरित स्थलांतरित करण्याची अंतिम नोटीस देण्यात आली आहे.
नोटीस अंतर्गत इमारत जीर्ण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इमारतीत वास्तव्य करणार्या नागरिकांनी अन्य सुरक्षितस्थळी त्वरित स्थलांतरित होण्याविषयी नोटिसीद्वारे बजावण्यात आले आहे. या सर्व इमारतींना ३० वर्षांहून अधिक कालावधी झालेला आहे. महापालिका प्रशासनाच्या धोरणानुसार शहर आणि उपनगरातील सर्व खासगी अन् महापालिका मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तात्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे, अशा अतीधोकादायक म्हणून गणल्या जातात. त्यानुसार वरील कारवाई करण्यात आली.