अमरावती येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६३ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका !
२१ लाखांचा माल जप्त, ११ धर्मांध कह्यात !
अमरावती – पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने ताजनगर येथील एका गोदामावर धाड टाकून कत्तलीसाठी आणलेल्या १६३ गोवंशियांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी ११ धर्मांधांना कह्यात घेतले असून १ जण पसार झाला आहे. ११ नोव्हेंबर या दिवशी ही कारवाई करण्यात आली. गोवंशियांच्या वाहतुकीसाठी वापरलेली २ मालवाहू वाहने आणि इतर साहित्य मिळून २१ लाख ७१ सहस्र रुपयांचा माल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. गोवंशियांनी कुठून आणि कुणी आणले ? याविषयी सखोल अन्वेषण करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी विशेष पथकाला दिल्या आहेत.
पोलिसांनी फकीर मोहम्मद अब्दुल रशीद (वय २७ वर्षे), फुरकान अहेमद शेख गुलाब (२३ वर्षे), अब्दुल अझहर अब्दुल नजीर (२८ वर्षे), जावेद शहा मंदू शहा (१९ वर्षे), शेख सोहेल शेख सुहान (२९ वर्षे), महंमद फरिद अब्दुल गफ्फार (४४ वर्षे), अश्फाक अहेमद अब्दुल मुनाफ (५० वर्षे), साजीद अहेमद शब्बीर कुरेशी (३२ वर्षे), अब्दुल जफर अब्दुल शकील (२८ वर्षे), अब्दुल फईम अब्दुल खलील (४३ वर्षे) आणि मकसूद अहेमद अब्दुल जलील (४४ वर्षे) अशी कह्यात घेतलेल्या धर्मांधांची नावे आहेत, तर गोदाम मालक शेख जाकीर शेख बब्बू (वय ५० वर्षे) हा पसार झाला आहे.
संपादकीय भूमिका
|