राज्यात राजकीय अस्थिरता येणार ! – ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे
नाशिक – सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण १५ दिवसांच्या अंतरावर आले होते. हा योग २९ वर्षांनी आला आहे. हा दुर्मिळ योग मानला जातो. याचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव दिसून येतो. येत्या २ मासांत राजकीय गटबाजी उफाळून येणार असून यामध्ये पक्ष फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरतेचा परिणाम दिसून येईल. राजकारणात गटबाजीचा धोका हा धक्कादायक असणार असून त्याचा फटका नागरिकांना बसेल, असा अंदाज येथील ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी व्यक्त केला. राज्यात रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या साहाय्याने राज्यात मोठे प्रकल्प येऊ शकतील, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.