नाशिक येथे सिद्धिविनायक बँकेतील ३ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद !
नाशिक – जिल्ह्यातील ओझर येथील सिद्धिविनायक बँकेत ३ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी १२ नोव्हेंबर या दिवशी ओझर पोलिसांनी रोखपालासह ५ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. यामध्ये ४ जणांना अटक करण्यात आली असून १ जण पसार आहे.
४ वर्षांपासून लेखापाल दिनेश शौचे यांनी स्वत:च्या अधिकाराचा अपवापर करून वेळोवेळी पतसंस्थेतील ३ कोटी ३३ लाख रुपये दुसरीकडे वळवले होते. बँकेतील कुठलाही अधिकारी त्यांना काहीच विचारणा करत नव्हता. काही दिवसांपूर्वी ‘बँकेच्या एका संचालकाने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे कि नाही, याविषयी चौकशी करून गुन्हा नोंद करू’, अशी भूमिका बँकेने घेतली होती. त्यामध्ये बँकेच्या कर्मचार्यांनी जुगारासाठी पैसे वापरल्याचेही समोर आले होते. (अशा कर्मचार्यांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाबँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करणार्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी ! |