‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट
रामनाथी (गोवा), १२ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर, तसेच स्मारकाचे कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर आणि संशोधक श्री. धनंजय शिंदे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. प्रशांत कोयंडे यांनी त्यांना आश्रमात चालणार्या कार्याविषयीची माहिती सांगितली.