चीनने तिची दुसरी हेरगिरी करणारी नौका हिंदी महासागरात पाठवली !

भारत करणार क्षेपणास्त्राची चाचणी

बीजिंग (चीन) – चीनने हिंदी महासागरात तिची दुसरी हेरगिरी करणारी नौका पाठवली आहे. यापूर्वी चीनने हेरगिरी नौका पाठवल्याने भारताने बंगालच्या उपसागरात करण्यात येणारी नियोजित अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी स्थगित केली होती. आता भारताने पुन्हा एकदा ही चाचणी करण्याची सिद्धता चालू केल्याचे लक्षात आल्यावर चीनने दुसरी हेरगिरी नौका पाठवली आहे. चीनने आधी ‘यूआन वांग ६’ ही नौका हिंदी महासागरात पाठवली होती. आता ‘यूआन वांग-५’ ही नौका पाठवली आहे.

भारत येत्या २३ किंवा २४ नोव्हेंबरला अग्नी क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २ सहस्र किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडीतून डागता येऊ शकणारे आहे.

संपादकीय भूमिका 

अशा धूर्त चीनशी सरकारने सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्याशी शत्रूप्रमाणे वागले पाहिजे आणि त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !