अयोध्येतील मशिदीसाठी मिळालेल्या दानापैकी ४० टक्के दान हिंदूंचे !
श्रीरामजन्मभूमीच्या बदल्यात मशिदीसाठी दिली होती जागा !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाला अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर भूमी देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर उत्तरप्रदेश सरकारकडून मुसलमानांना अयोध्येत ५ एकर भूमी देण्यात आली. आता तेथे मशीद बांधण्याचे काम चालू आहे. या मशिदीसाठी जो काही पैसा देणगी म्हणून मिळाला आहे, त्यांतील ४० टक्के दान हिंदूंनी दिल्याचे समोर आले आहे. ३० टक्के दान आस्थापनांकडून, तर ३० टक्के मुसलमानांकडून मिळाले आहे.
Hindus contribute 40% of donations for Ayodhya Mosque against 30% by Muslims which was declared haram by Islamists, construction yet to starthttps://t.co/rr04WqbSKz
— OpIndia.com (@OpIndia_com) November 12, 2022
१. मशिदीच्या ट्रस्टचे सचिव अतहर हुसेन यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२० मध्ये देणग्यांविषयीचे बँकांच्या खात्यांची माहिती पाहिली, तर त्यानुसार आम्हाला ४० लाख रुपये मिळाले. यांतील ३० टक्के रक्कम आस्थापने, ३० टक्के मुसलमान आणि ४० टक्के रक्कम हिंदूंकडून प्राप्त झाली.
२. ट्रस्टच्या माहितीनुसार गुप्तदान करणार्यांमध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे. मशिदीसाठी पहिले दान देणारे ११ जण हिंदूच आहेत.
संपादकीय भूमिका
|