सात्त्विक मराठी भाषेतील अक्षरांतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

तामसिक इंग्रजी भाषेतील अक्षरांतून नकारात्मक स्पंदने आणि सात्त्विक मराठी भाषेतील अक्षरांतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सत्य-त्रेता-द्वापर या युगांतील लोकांमध्ये सात्त्विकता होती. त्या काळातील समाज साधना करणारा असल्याने सर्वाधिक सात्त्विक असणारी संस्कृत भाषा सर्वत्र प्रचलित होती. जसा कलियुगास आरंभ झाला, तसे समाज रज-तमप्रधान होत गेला. संस्कृत भाषेतून प्रक्षेपित होणारी सात्त्विक स्पंदने ग्रहण करणे रज-तमप्रधान समाजाला शक्य झाले नाही. याचा परिणाम म्हणून कालांतराने संस्कृत भाषा लोप पावून विविध भाषांचा उगम झाला. संस्कृत भाषेनंतर मराठी त्यातल्या त्यात सर्वाधिक सात्त्विक भाषा आहे. सध्याच्या रज-तमप्रधान काळात इंग्रजी भाषेचा प्रसार अतिशय वेगाने झाला आहे. इंग्रजीचा वापर सर्वच क्षेत्रांत पुष्कळ प्रमाणात होतांना दिसून येतो. इंग्रजी आणि मराठी भाषांतील अक्षरांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांच्या अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने वैज्ञानिक उपकरणाद्वारे एक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.


सौ. मधुरा धनंजय कर्वे

१. इंग्रजी अक्षरे

इंग्रजी, फ्रेंच आदी पाश्चात्त्य भाषांतील लिखाणासाठी ‘रोमन लिपी’ वापरतात. इंग्रजी भाषेच्या वर्णमालेत ‘A’, ‘B’, ‘C’ इत्यादी २६ मुळाक्षरे आहेत.

२. मराठी अक्षरे

मराठी, हिंदी यांसारख्या भारतीय भाषांतील लिखाणासाठी संस्कृत भाषेतील ‘देवनागरी लिपी’ वापरतात. मराठी भाषेत ‘अ’, ‘आ’, ‘इ’ इत्यादी ५२ मुळाक्षरे आहेत.

३. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

इंग्रजी अक्षरे आणि मराठी अक्षरे यांची संगणकीय प्रत (प्रिंट) काढून त्यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

३ अ. इंग्रजी अक्षरांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : इंग्रजी भाषेतील ‘A’ ते ‘Z’ या सर्वच अक्षरांमध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नसून नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

३ आ. मराठी भाषेतील अक्षरांमधून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : मराठी भाषेतील अक्षरांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सकारात्मक ऊर्जा आहे.

४. विविध भाषांतील एकाच मजकुरातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास

विविध भाषांतील एकाच मजकुरातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला अस्ताला जातो’, हे वाक्य संस्कृत, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू अन् मल्याळम् या भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषा (विदेशी भाषा) यांमध्ये भाषांतरित करण्यात आले. प्रत्येक भाषेतील वरील वाक्याची संगणकीय प्रत (प्रिंट) काढण्यात आली. त्यानंतर प्रत्येक भाषेतील प्रिंटची ‘यू.ए.एस्.’उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

४ अ. इंग्रजी भाषेतील वाक्यातून सर्वाधिक प्रमाणात नकारात्मक स्पंदने आणि संस्कृत भाषेतील वाक्यातून सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

टीप – ‘ऑरा स्कॅनर’ने ९० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. इंग्रजी भाषेतील वाक्यात पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अत्यल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.

२. तमिळ, तेलुगु, मल्याळम् आणि कन्नड या भाषांतील वाक्यात अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि मध्यम प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.

३. हिंदी, मराठी आणि संस्कृत या भाषांतील वाक्यात नकारात्मक ऊर्जा काहीच नसून चढत्या क्रमाने सकारात्मक ऊर्जा आहे.

४. देवनागरी लिपी असलेल्या भाषांमध्ये (संस्कृत, मराठी, हिंदी यांमध्ये) अन्य भाषांच्या तुलनेत अधिक सकारात्मक ऊर्जा आहे.

५. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

५ अ. इंग्रजी आणि मराठी भाषांतील अक्षरांचा प्रकार, प्रधान गुण, अक्षरसंख्या आणि संख्येचे प्रमाण : ‘पुढील सारणीतून ‘इंग्रजी भाषा तामसिक आणि तिच्या तुलनेत मराठी भाषा पुष्कळ सात्त्विक का आहे ?’, हे लक्षात येईल.

टीप – मराठी भाषेत एकूण ५२ अक्षरे आहेत. त्यांपैकी काही अक्षरे उदा. ऋृ, लृ आदी अक्षरांपासून होणारे शब्द नाहीत; त्यामुळे एकूण ४८ अक्षरसंख्या लिहिली आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले. (१९.१.२००७)

५ आ. इंग्रजी भाषेतील अक्षरांमधून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांमुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येणे : इंग्रजी भाषेत तमप्रधान अक्षरांचे प्रमाण ५८ टक्के म्हणजे पुष्कळ अधिक आहे. इंग्रजी भाषेतील मायावी स्पंदनांच्या प्रभावामुळे लोकांना इंग्रजीविषयी पुष्कळ आकर्षण वाटते. त्यामुळे भारतात देववाणी संस्कृत, तसेच स्थानिक भारतीय भाषांची उपेक्षा होऊन इंग्रजीचे स्तोम सर्वत्र वाढत गेले. साधना न करणार्‍यांना सात्त्विक अन् असात्त्विक गोष्टींतील भेद लक्षात येत नाही. याचे हे उत्तम उदाहरण आहे. इंग्रजी भाषेतील अक्षरांतून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक स्पंदनांमुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येते.

५ इ. मराठी भाषेतील अक्षरांमधून प्रक्षेपित होणार्‍या सकारात्मक स्पंदनांमुळे व्यक्तीला सात्त्विकतेचा लाभ होणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. यानुसार जेथे शब्द, म्हणजे उच्चार असतो, तेथे त्याचे रूपही असते, म्हणजे त्याचा आकार असतो. अक्षराच्या उच्चाराचे, म्हणजे ‘शब्दा’चे जे रूप आहे, त्याचप्रमाणे मराठी भाषेत ते अक्षर लिहिले जाते. मराठी भाषेतील अक्षरांमध्ये रज अन् सत्त्वगुण प्रधान अक्षरांचे प्रमाण अधिक असल्याने त्या अक्षरांतून सकारात्मक (सात्त्विक) स्पंदने प्रक्षेपित होतात. मराठी भाषेत तमप्रधान अक्षरे ११ टक्के आहेत; पण इंग्रजी अक्षरांच्या तुलनेत हे प्रमाण खूप अल्प आहे. मराठी भाषेचा उपयोग करणार्‍यांना त्यातील सात्त्विकतेचा लाभ होतो. याउलट इंग्रजी अक्षराचा उच्चार आणि रूप यांत विसंगती असल्याने त्यामध्ये नकारात्मक (तामसिक) स्पंदने अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे इंग्रजी भाषेचा उपयोग करणार्‍यांना त्यातील त्रासदायक स्पंदनांमुळे आध्यात्मिकदृष्ट्या हानी होते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२२.२.२०२२)

ई-मेल : mav.research2014@gmail.com

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘असुरांच्या तामसिक इंग्रजी भाषेत आपल्या मुलांना न शिकवता आणि व्यवहारात तिचा वापर न करता मराठी, हिंदी, गुजराथी, कन्नड…. इत्यादी भारतीय भाषांत मुलांना शिकवा अन् त्यांचा वापर करा !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले. (१९.१.२००७)


देवनागरी लिपीशी जुळणार्‍या भाषा अधिक सात्त्विक असणे

कु. मधुरा भोसले

‘भारतीय भाषांमध्ये द्राविडी भाषांच्या तुलनेत देवनागरी लिपीशी आणि संस्कृत भाषेशी जुळणार्‍या भाषा अधिक प्रमाणात सात्त्विक आहेत. उदा. तमिळ किंवा मल्याळम् या भाषांच्या तुलनेत मराठी, गुजराती किंवा बंगाली या भाषा देवनागरी लिपितील असून त्यांचे संस्कृत भाषेशी अधिक प्रमाणात साम्य असल्याने या भाषा सात्त्विक आहेत. सात्त्विक भाषांमध्ये संभाषण करणे, ऐकणे किंवा लिहिणे यांमुळे व्यक्तीची सात्त्विकता वाढून तिला आध्यात्मिक स्तरावर अधिक प्रमाणात लाभ होतो.

विदेशी भाषा तामसिक असणे : विदेशी भाषेतील अक्षरे अत्यंत तामसिक आहेत. त्याचप्रमाणे या भाषांचे संस्कृतशी साम्य नसल्यामुळे त्या भाषांतील अक्षरांचे त्यांच्या उच्चारांशी अत्यल्प प्रमाणात साम्य आहे. त्यामुळे विदेशी भाषा बोलल्यामुळे व्यक्तींचा तमोगुण वाढून त्यांची आध्यात्मिक स्तरावर हानी होऊन त्यांना अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ शकतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१२.२०२०)

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.