वर्ष १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी असणार्या टायटलर यांना काँग्रेसने बनवले निवडणूक समितीचे सदस्य !
नवी देहली – येथे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी असलेले काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांना काँग्रेसने देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या निवडणूक समितीचे सदस्य बनवले आहे. पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शपथ समारोहाच्या कार्यक्रमातही प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावर भाजपचे नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी टीका करतांना म्हटले आहे की, काँग्रेसने टायटलर यांना या कार्यक्रमात सहभागी करून ‘ती अशा आरोपींना किती सुरक्षा आणि सन्मान देते’, हे पुन्हा समोर आले आहे. या मारेकर्यांनी गांधी परिवाराच्या साहाय्याने वर्ष १९८४ चे हत्याकांड घडवले असतांना अजूनही त्यांचा सन्मान केला जात आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसने नेहमीच या आरोपींना पाठीशी घातले असल्याने त्यात नवीन काही नाही ! यातून अहिंसावादी गांधी यांचे नाव घेणार्या काँग्रेसची खरी मानसिकता काय आहे, हे नेहमीच लक्षात राहील ! |