ज्ञानवापीतील शिवलिंगाचे संरक्षण करण्याचा आदेश कायम !
नवी देहली – वाराणसी येथील ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाला संरक्षण देण्याचा पूर्वी दिलेला आदेश सर्वाेच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पुढील आदेशापर्यंत संरक्षण देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. यासह या प्रकरणी उत्तर देण्यास हिंदु पक्षाला ३ आठवड्यांचा अवधी दिला आहे. १७ मे २०२२ या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी सर्वाेच्च न्यायालयाने संरक्षणाचा आदेश दिला होता. हा आदेश वाढवून मागण्यासाठी हिंदु पक्षाने याचिका प्रविष्ट केली होती.