५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला खडकेवाडा (तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर) येथील कु. गुरुदास दत्तात्रय लोहार (वय १४ वर्षे) !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
‘मला गर्भधारणा झाल्यापासून ९ व्या मासापर्यंत कुठलाच शारीरिक त्रास झाला नाही. सातव्या मासामध्ये पोटावर हात ठेवून नामजप करतांना ‘गर्भ नामजप करत आहे’, असे मला जाणवायचे. त्या वेळी मला गर्भाची हालचाल अधिक जाणवायची. गर्भारपणात मी आध्यात्मिक स्तरावरील सर्व उपाय आणि नामजप पूर्ण करून अध्यात्मप्रसाराची सेवा करत होते.
२. प्रसुती
प्रसुतीच्या वेळी माझा नामजप अखंड चालू होता. मला कोणताही त्रास झाला नाही.
३. जन्मानंतर
३ अ. समंजस : कु. गुरुदास २ वर्षांचा असल्यापासून मी त्याला घरी त्याची आजी (श्रीमती अक्काताई लोहार) आणि बाबा (श्री. दत्तात्रय लोहार) यांच्याजवळ ठेवून सेवेला जात असे. त्या वेळी तो त्यांना कसलाही त्रास देत नसे.
३ आ. साधकांशी मिळून-मिसळून वागणे : आमच्या घरी सेवेनिमित्त अधूनमधून धर्मरथ येत असे. तेव्हा २ दिवस धर्मरथातील साधक आमच्या घरी निवासाला असायचे. गुरुदास त्यांच्याशी मिळून-मिसळून वागायचा. तो ‘साधकांना खाऊ देणे, त्यांच्याशी खेळणे, बोलणे’, अशा कृती करायचा. साधक आल्यावर तो आनंदी असायचा.
३ इ. सेवेची आवड : तो पाचवीत असतांना बाहेरगावच्या शाळेत शिकत होता. तेथे तो त्याच्या मित्रांना सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगायचा. आताही तो प्रासंगिक सेवा करतो.
३ ई. देवतांच्या मूर्ती बनवणे
१. गुरुदासने वयाच्या १२ व्या वर्षी श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी एक लहान गणेशमूर्ती बनवली. गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याने त्या मूर्तीची पूजा करून नंतर तिचे विसर्जन केले.
२. त्याला शिवपिंडी चांगली बनवता येते. एकदा त्याने शिवपिंडी बनवली. तेव्हा ती ठेवण्यासाठी मंदिर बनवले होते. त्याने बनवलेल्या शिवपिंडीकडे पाहून पुष्कळ चांगले वाटत होते.
४. स्वभावदोष
अव्यवस्थितपणा, हट्टीपणा आणि मनाने करणे’
– सौ. रेखा दत्तात्रय लोहार (आई), खडकेवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. (१०.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |