वणी (जिल्हा यवतमाळ) परिसरात वाघाने घेतला युवकाचा बळी !
वणी (जिल्हा यवतमाळ), ११ नोव्हेंबर (वार्ता.)- तालुक्यातील भुरकी या गावी १० नोव्हेंबर या दिवशी अभय देऊळकर (वय २३ वर्षे) या युवकाचा वाघाने बळी घेतला. अभय शेताजवळील नदीच्या काठी पडीक भूमीवर बैलांना चारत होता. अचानक काही कळायच्या आत वाघाने झडप घालून त्याची मान पकडून त्याला फरफटत नेले. बाजूच्या शेतातील रामदास आगलावे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. गावातून अनेक जण लाठ्याकाठ्या घेऊन आले आणि त्यांनी वाघाला हुसकावले; मात्र तोपर्यंत अभयचा मृत्यू झाला होता.