शाश्वत आनंदप्राप्तीसाठी साधनारत रहा ! – नागेश गाडे, समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक
रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात ‘साधना शिबिरा’स आरंभ
रामनाथी (फोंडा, गोवा) – ईश्वरप्राप्ती म्हणजेच मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचे खरे ध्येय आहे. साधना करूनच हे ध्येय साध्य होऊ शकते; पण सध्या कुठेच साधना शिकवली जात नाही. प्रत्येक जिवाची आनंदप्राप्तीसाठी सर्व धडपड चालू असली, तरी साधनेच्या अभावी आज जवळपास सर्वजण आनंदी तर नाहीच; पण दुःखी आणि तणावग्रस्त आहेत. साधना करणे हाच शाश्वत आनंदाचा मार्ग आहे, असे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांनी केले. येथील सनातन आश्रमात ११ नोव्हेंबरपासून ३ दिवसांचे ‘साधना शिबिर’ आरंभ झाले आहे. त्याच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे माजी संपादक पू. पृथ्वीराज हजारे आणि मुंबई येथील व्यावसायिक श्री. अशोक दाभोळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या शिबिराला आरंभ झाला. या शिबिरात महाराष्ट्र आणि गोवा येथील जिज्ञासू सहभागी झाले आहेत.