रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आल्यावर ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’ या वचनाची प्रचीती घेतलेल्या सौ. सोनाली पोत्रेकर !
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले. त्यानंतर माझ्यात झालेले पालट, मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती यांविषयांची माहिती पुढे दिली आहे.
१. मनाच्या स्थितीत झालेले पालट
माझ्या मनात येणार्या अनावश्यक विचारांचे प्रमाण न्यून झाले. माझे मन स्थिर झाले आहे.
२. मी आश्रमातील मार्गिकेत चालत असतांना मला ध्यानमंदिर, भोजनकक्ष, संत ज्या ठिकाणी बसून साधकांसाठी नामजपादी उपाय करतात, ते ठिकाण यांच्याप्रती, तसेच आश्रमातील प्रत्येक कणाच्या प्रती कृतज्ञता वाटते.
३. अनुभूती
अ. परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्याच कृपेने माझा ‘परम पूज्य, परम पूज्य’, असा नामजप चालू असतो. मला काही शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रास होतांना किंवा मला काही अडचण असल्यास माझा ‘परम पूज्य’ हा नामजप आपोआप चालू होतो.
आ. मी आश्रमातील देवतांच्या मूर्तींचे दर्शन घेतांना प्रतिदिन मला निर्विचार स्थिती अनुभवता येते.
इ. मारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेतांना ‘ती मूर्ती हालचाल करत आहे’, असे मला जाणवते.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’, हे मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. हे गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), आपल्या कृपेमुळे मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. मला आणखी काही नको. ‘हे गुरुमाऊली, आता तुम्हीच माझ्याकडून साधना करून घ्या. तुम्ही माझ्यासाठी पुष्कळ केले आहे. तुम्हीच माझ्याकडून प्रयत्न करून घेणार आहात. गुरुदेवा, मी साधनेचे प्रयत्न करण्यात अल्प पडते. ‘माझ्याकडून योग्य क्रियमाण वापरले जाऊ दे’, अशीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. ‘मला केवळ तुमचे आज्ञापालन करायचे आहे’, एवढेच माझ्या लक्षात आहे.’
– सौ. सोनाली पोत्रेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |