‘ब्रिटन गुलामांच्या रक्तावर उभा आहे’, असे म्हणत तरुणाने ब्रिटनचे राजे चार्ल्स (तृतीय) यांच्यावर अंडी फेकली !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या यॉर्कशायरमध्ये राजा चार्ल्स (तृतीय) यांच्यावर येथे आंदोलन करणार्‍या २३ वर्षीय तरुणाने अंडी फेकल्याने त्याला अटक करण्यात आली. ही ही अंडी चार्ल्स यांना लागली नाहीत. ‘हा देश गुलामांच्या रक्ताने बनला आहे. त्या माणसाला (राजा चार्ल्स) राजा बनवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. असा न्याय जो लोकांना दिसू शकेल’, असे हा तरुण ओरडत होता. राजाने या घटनेकडे दुर्लक्ष केले. अंडी फेकणार्‍या तरुणाचे नाव पॅट्रिक थेलवेल आहे. तो डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता असून स्थानिक निवडणुकीत ग्रीन पार्टीचा उमेदवार आहे.

वर्ष १९८६ मध्ये राणी एलिझाबेथवरही अंडी फेकण्यात आली होती. न्यूझीलंडच्या दौर्‍यावर असतांना उघड्या चारचाकीतून जातांना २ महिलांनी त्यांच्यावर अंडी फेकली होती. यासह वर्ष २००१ मध्ये प्रिन्स चार्ल्स लॅटव्हियाच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी एका १६ वर्षीय मुलीने त्यांना थप्पड मारली होती.