भिंड (मध्यप्रदेश) येथील स्मशानभूमीतील मंदिरामधील घंटा आपोआप वाजू लागली !
भिंड (मध्यप्रदेश) – भिंड शहरातील धर्मापुरी मुक्तिधाम स्मशानभूमीमध्ये महाकाल मंदिर आहे. या मंदिरात असलेली घंटा सायंकाळी अचानक आपोआप हलू आणि वाजू लागली.
OMG : स्मशानभूमीत बांधलेल्या महाकाल मंदिरात अचानक सुरू झाला घंटानाद, तज्ज्ञांनी सांगितलं सत्य… https://t.co/CcCofM9Y9i
— Maharashtra Times (@mataonline) November 10, 2022
या घंटेचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. ही घटना पहाण्यासाठी मंदिरात मोठ्या प्रमाणेत गर्दी झाली होती. अनुमाने ४ घंटे ही घंटा वाजत होती. याविषयी सध्या कोणतेही कारण समोर आलेले नसले, तरी लोक या घटनेला भूत किंवा दैवी शक्ती यादृष्टीने पहात आहेत.