हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे निवेदन
शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) – हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा, या मागणीसाठी शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन महसूल अवल कारकून शब्बीर मोमीन यांनी स्वीकारले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अविनाश ऐनापुरे, विनायक पाटील, संतोष शिंदे, धनंजय यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री, बजरंग दलाचे कार्यकर्ते, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.