पंजाबमधील भारत-पाक सीमेवर सीमा सुरक्षा दलाने पाडले पाकिस्तानी ड्रोन !
फतेहपूर (पंजाब) – सीमा सुरक्षा दलाने येथील भारत-पाक सीमाभागात एका पाकिस्तानी ड्रोनवर आक्रमण करून ते पाडले. याआधी १४ ऑक्टोबरलाही सुरक्षा दलाने अमृतसर येथे पाकचे ड्रोन पाडले होते. त्या वेळी सैनिकांनी ड्रोन पाडण्यासाठी त्यावर १७ गोळ्या झाडल्या होत्या. गेल्या वर्षभरात पाकिस्तानकडून भारतीय सीमेत ड्रोन सोडण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढले असून त्याद्वारे शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ पाठवले जाते, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशक पंकज कुमार सिंह यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.
संपादकीय भूमिकापाकचे ड्रोन पाडण्यासह आता सरकारने पाकचाच संपूर्ण पाडाव करावा, अशी जनतेची अपेक्षा आहे ! |