(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !
१. पूर्वसूचना मिळणे
२९ जून २०२२ या दिवशी देवाने मला सांगितले की, ‘आजपासून चार मास पूर्ण झाल्यावर पू. पद्माकर होनप देहत्याग करतील. त्याप्रमाणे २९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी चार मास पूर्ण होताच ३० ऑक्टोबर २०२२ या दिवशी सायंकाळी पू. होनपकाकांनी देहत्याग केला.
२. (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांच्या दिव्य आत्मज्योतीचे दर्शन होऊन चैतन्य मिळणे
३० ऑक्टोबर २०२२ या दिवशी दुपारी ४ वाजता माझ्या मनात विचार आला की, ‘आज पू. पद्माकर होनपकाका देहत्याग करतील.’ त्याप्रमाणे त्यांनी दुपारी ४.२७ वाजता देह ठेवला. तेव्हा त्यांच्या आज्ञाचक्रातून पिवळसर पांढर्या रंगाची आत्मज्योत त्यांच्या देहातून आश्रमाच्या इमारतीच्या बाहेर वरच्या दिशेने वेगांना जातांना दिसली. तेव्हा या ज्योतीकडे पाहिल्यावर ती पुष्कळ निर्मळ असल्यामुळे चैतन्यदायी असल्याचे जाणवले आणि तिला पाहून मला चैतन्य मिळून माझ्याभोवतीचे त्रासदायक (काळे) आवरण पूर्णपणे निघून गेले.
३. (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या संदर्भात सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
३ अ. संतत्वाकडून सद्गुरुपदाकडे वाटचाल चालू असणे : त्यांची आध्यात्मिक वाटचाल संतत्वाकडून सद्गुरुपदाकडे वेगाने चालू होत आहे. ‘(कै.) पू. पद्माकर होनप यांनी सद्गुरुपद प्राप्त केल्याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले केव्हाही घोषित करतील’, असे जाणवले.
३ आ. विविध योगमार्गांनुसार साधना केलेली असणे : (कै.) पू. पद्माकर होनप हे मूळ कर्मयोगी असून या जन्मात त्यांची भक्ती, ध्यान आणि ज्ञान या योगांनुसार साधना श्रीगुरुकृपेने झाली. यापुढील जन्मात त्यांची साधना प्रामुख्याने ज्ञानयोग आणि गुरुकृपायोग यांच्यानुसार चालू असणार आहे.
३ आ १. विविध योगमार्गांनुसार साधना केल्यामुळे (कै.) पू. पद्माकर होनपकाकांची झालेली विचारप्रक्रिया
३ इ. तीव्र प्रारब्धभोग भोगून ५० टक्के संचित भोगून संपवले असणे : (कै.) पू. पद्माकर होनप यांना कर्करोग झाल्यामुळे त्यांचे आयुष्य अत्यंत खडतर होते. या जन्मात त्यांनी तीव्र प्रारब्धभोग भोगून संपवले. त्यामुळे त्यांच्या एकूण संचितातील ५० टक्के संचित भोगून संपले आहे. उर्वरित ५० टक्के संचित भोगण्यासाठी ते पुन्हा हिंदु राष्ट्रात पृथ्वीवर मनुष्यदेह धारण करतील. पुढील जन्मात ते जन्मत:च गुरु असतील आणि सद्गुरुपदी विराजमान राहून ते अनेक जिवांना साधनेचे मार्गदर्शन करतील.
३ ई. व्यष्टी जीवनाकडून समष्टी जीवनाकडे मार्गक्रमण करणे : अशाप्रकारे मूळ व्यष्टी प्रकृती असणार्या (कै.) पू. पद्माकर होनपकाकांची या जन्मात वाटचाल व्यष्टी जीवनाकडून समष्टी जीवनाकडे चालू झाली. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी संतपद प्राप्त केले. त्यानंतर त्यांचा पुढील जन्म पूर्णपणे समष्टी स्वरूपाचा असेल. त्यामुळे त्यांच्या साधनेची वाटचाल सद्गुरुपदाकडून परात्पर गुरुपदाकडे होणार आहे. ‘श्रीगुरु कशा प्रकारे शिष्यांची आध्यात्मिक उन्नती करवून घेतात’, हे (कै.) पू. पद्माकर होनपकाकांच्या उदाहरणातून शिकायला मिळाले.
३ उ. आत्मज्योतीचा सूक्ष्मातील प्रवास : ‘(कै.) पू. पद्माकर होनपकाकांच्या देहत्यागाच्या वेळी त्यांच्या देहातून बाहेर गेलेल्या आत्मज्योतीचा प्रवास जनलोकाकडे चालू झाला. काही क्षणातच ती जनलोकात स्थिरावली. तेव्हा या ज्योतीमध्ये कार्यरत चैतन्य सक्रीय असल्यामुळे तिच्याभोवती पिवळसर रंगाची किनार होती. काही दिवसांनी जेव्हा (कै.) पू. पद्माकर होनपकाका सद्गुरु झाल्याचे घोषित होईल, तेव्हा त्यांच्या आत्मज्योतीचा प्रवास जनलोकाकडून तपोलोकाकडे चालू होणार असून तेथे ती स्थिर होणार आहे. तेव्हा या ज्योतीमध्ये शुद्ध चैतन्य कार्यरत असल्यामुळे तिच्याभोवती चंदेरी रंगाची किनार असणार आहे.
३ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असीम कृतज्ञताभाव असणे : (कै.) पू. पद्माकर होनपकाकांच्या मनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असीम कृतज्ञताभाव होता. त्यामुळे ते मृत्यूला वीर योद्ध्याप्रमाणे धिराने सामोरे गेले. त्यामुळे जेव्हा मला त्यांच्या आत्मज्योतीचे दर्शन झाले, तेव्हा माझ्या हृदयातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा कृतज्ञताभाव जागृत झाला.
कृतज्ञता : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे (कै.) पू. पद्माकर होनपकाकांच्या संदर्भातील सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक सूत्रे शिकायला मिळाली’, यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
|