पहिल्या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांना स्पर्श !
श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव !
कोल्हापूर, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजता सूर्यकिरणे महाद्वार येथे होती, यानंतर ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणे देवीच्या चरणांना स्पर्श करून डाव्याबाजूने लुप्त झाली. दुसर्या दिवशी ही किरणे कमरेपर्यंत, तसेच तिसर्या दिवशी तोंडावळ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होतो.