संभाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी मनसेच्या वतीने आंदोलन !
संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ९ नोव्हेंबर या दिवशी येथील शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी आंदोलन करण्यात आले. सरकारने त्वरित पूर्ण निधी संमत करून भुयारी मार्ग सिद्ध करून द्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी मनसेच्या वतीने या वेळी देण्यात आली.
#Aurangabad : लवकरात लवकर भुयारी मार्गाचे काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा #Subwayhttps://t.co/TDQVg0RJQF
— ABP माझा (@abpmajhatv) November 9, 2022
संभाजीनगर येथील शिवाजीनगर येथून रेल्वेचा मार्ग आहे; मात्र रेल्वे आल्यानंतर येथील प्रवेशद्वार बंद होते. त्यामुळे शेकडो लोक अडकून पडतात. दिवसभरात असे अनेकदा होते. त्यामुळे या‘ भागात संग्रामनगरप्रमाणे भुयारी मार्ग बांधावा’, अशी मागणी होत आहे. या मागणीला संमतीही मिळाली आहे; मात्र अजून काम चालू झालेले नाही. गेल्या दशकापासून हा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे सातारा देवळाई, शिवाजीनगर येथे रहाणार्या लाखो लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.