सोलापूर पद्मब्राह्मण पौरोहित संघमच्या वतीने १०८ सामूहिक श्री सत्यनारायण व्रतपूजन सोहळा उत्साहात !
सामूहिक श्री सत्यनारायण व्रतपूजन करतांना दांपत्य
सोलापूर, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – पवित्र शिवकेशव मास निमित्त कार्तिक शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर १०८ सामूहिक श्री सत्यनारायण व्रतपूजन करण्यात आले. हे व्रतपूजन पूर्व भागातील पद्मावती कॅनर्व्हेशन सभागृह येथे भक्तीमय वातावरणात करण्यात आले. सत्यनारायण व्रतपूजन अखिल भारत पद्मब्राह्मण पौरोहित संघमचे सचिव ब्रह्मश्री पुंडलिकानंद ताटीपामुल, वेदश्री अंबादास बिटला पंतुलू, सोलापूर पद्मब्राह्मण संघमचे अध्यक्ष राजेश मागणुर यांच्या मुख्य पौरोहित्याखाली पार पडले.
सौजन्य स्वरांजली न्युज
या वेळी प्रसिद्ध उद्योजक श्री. पेंटप्पा गड्डम, पद्मावती कॅनर्व्हेशन सभागृहाचे संचालक गंगाधर देवसानी, पत्रकार आणि कवयित्री रेणुका बुधारम, उद्योजक राजेशम बोल्ली, स्वराज्य संघमचे गुरुजी ब्रह्मश्री नरसिंहनंद अल्ली महाराज आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ब्रह्मश्री सत्यनारायण जोगु पंतुलू, बलराज दोंतुल पंतुलू, राजा बुर्ला पंतुलू यांसह अन्य पंतुलू यांनी परिश्रम घेतले.
विशेष – या वेळी सर्व यजमान भक्तांना पद्मब्राह्मण पौरोहित संघमच्या वतीने सनातन वैदिक हिंदु धर्माची महती सांगणारे ‘सनातन पंचाग २०२३’ भेट देण्यात आले.