संभाजीनगर येथे ग्राहक येण्यासाठी महामार्गावरील दुभाजक तोडले !
१५ व्यावसायिकांवर गुन्हे नोंद !
संभाजीनगर – व्यवसाय चांगला चालवा आणि ग्राहक यावेत, यासाठी येथील काही व्यावसायिकांनी ग्रामीण भागातील महामार्गावरील ‘लेन’मध्ये असलेले दुभाजक तोडून वळण रस्ता सिद्ध केला आहे. यातून अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा १५ व्यावसायिकांवर ४ नोव्हेंबर या दिवशी गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये ५ वर्षांपर्यंत कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा प्रस्तावित आहे. (प्रशासनाने नियमाप्रमाणे अपघात न होण्यासाठी दुभाजक केलेले असतांना ते तोडून स्वार्थ साधणार्या व्यावसायिकांचे परवानेही रहित केले पाहिजेत. – संपादक) पोलिसांनी कारवाई पुढे चालूच ठेवणार असल्याचे सांगितले. महामार्गावर अपघात होऊ नयेत किंवा वाहनांचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी दुभाजक सिद्ध केलेले असतात.
#Aurangabad : ग्राहकांनी आपल्या दुकानात यावे म्हणून व्यवसाईकांनी भलतच काही केल्याने जेलमध्ये जाण्याची वेळ #Highwayhttps://t.co/27ofaYaLWT
— ABP माझा (@abpmajhatv) November 5, 2022