‘रणरागिणी’ या शब्दाचा राजकारणी लोकांनी पार चोथा केला आहे ! – शरद पोंक्षे
पुणे – राजकारणी लोकांनी ‘रणरागिणी’ हा शब्द बदनाम केला असून या शब्दाचा पार चोथा केला आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी साहित्याच्या वतीने लेखिका शेफाली वैद्य यांच्या ‘नित्य नूतन हिंडावे’ आणि ‘चितरंगी रे’ या २ पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी शरद पोंक्षे बोलत होते. धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेम यातून शेफाली यांची ओळख झाली. त्यांच्यासाठी ‘रणरागिणी’ या शब्दाऐवजी ‘दुर्गा’ हा शब्द त्यांच्यासाठी योग्य आहे, असे पोंक्षे यांनी सांगितले.