नागपूर येथे पोलिसांची ३ वाहने जाळल्याचा संशय !
नागपूर – येथील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील पोलीस चौकीसमोर ठेवलेली पोलीस कर्मचार्यांची वाहने गुन्हेगारांनी जाळली आहेत. या वेळी पोलीस चौकीतील पडदे जळले आहेत. खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. गुंडांनी हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
१. शहरातील बोले पेट्रोल पंपाजवळील वसंतराव नाईक झोपडपट्टीमध्ये कुख्यात भुरू टोळीच्या गुंडांचा वावर असल्याने येथील नागरिक त्रस्त होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरात पोलीस चौकी सिद्ध केली. याचा राग तेथील गुंडांच्या मनात होता. या रागातूनच गुंडांनी वरील प्रकार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
२. मध्यरात्री बीट मार्शल दिगंबर मोटे, मोहन पराडकर आणि श्याम पांडे यांनी गस्तीवर जातांना त्यांच्या दुचाकी पोलीस चौकीच्या बाजूला लावल्या होत्या. मध्यरात्री १.४५ वाजता दुचाक्यांना आग लागली पोलिसांनी स्थानिकांच्या साहाय्याने चौकीच्या खिडकीवर पाणी टाकून आग विझवली.
३. झालेल्या प्रकाराविषयी कुणाकडूनही माहिती मिळाली नाही. घटनेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे आरोपींचाही सुगावा लागला नाही. सीताबर्डी पोलिसांनी जाळपोळीचा गुन्हा नोंद करून अन्वेषण चालू केले आहे.
संपादकीय भूमिका
|