कळव्याजवळ धावत्या लोकलगाडीवर दगडफेक, १ जण घायाळ
ठाणे, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – मुंबई येथून कल्याणच्या दिशेने धीम्या मार्गावरून जाणार्या लोकलगाडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना ७ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. कळवा रेल्वेस्थानक येण्यापूर्वी असलेल्या रेल्वे पुलाजवळ गाडी आली असता कळवा येथे उतरण्यासाठी दरवाज्यात उभे असलेले बालचंद गुप्ता (वय ३५ वर्षे) यांच्या नाकाला दगड लागल्यामुळे त्यांना रक्तस्राव झाला. त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. यापूर्वीही समाजकंटकांकडून अशा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये महिला घायाळ झाल्या होत्या. रेल्वे प्रशासनाने याची नोंद घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
संपादकीय भूमिकारेल्वेस्थानक परिसरातील अनधिकृत झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालवल्याविना समाजकंटकांची दुष्कृत्ये बंद होणार नाहीत, असेच प्रवाशांना वाटते ! |