अमरावती येथे रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या गोमातेचे गोप्रेमी आकाश दाभाडे यांच्याकडून अंतिम संस्कार !
अमरावती, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – श्री. आकाश दाभाडे हे थडी, जिल्हा अमरावती येथील गोरक्षक आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आहेत. ८ नोव्हेंबर या दिवशी कार्यालयात जात असतांना मार्गात त्यांना गोमाता मृतावस्थेत दिसली. अंतिम संस्कारासाठी एका व्यक्तीने खड्डा खणण्यासाठी १ सहस्र ५०० रुपये सांगितल्यावर गोमातेची मालकी असलेली व्यक्ती तेथून निघून गेली. हे पाहिल्यावर श्री. दाभाडे यांनी कार्यालयात जाण्याचे रहित करून स्वतः ती रक्कम भरून गोमातेचे अंतिम संस्कार केले.
संपादकीय भूमिकाअशा खर्या गोप्रेमींमुळेच आपल्या गोमाता सुरक्षित रहातील यात शंका नाही ! |