हिंदुत्वनिष्ठांच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित !
|
मुंबई – हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचे विज्ञापन करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित केल्याची घोषणा आयोजकांनी केली. ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने यासाठी विविध माध्यमांतून पुष्कळ विरोध केला होता. समितीच्या या यशाविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी सहभागी सर्व संघटना आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले, तसेच ईश्वरचरणी कृतज्ञताही व्यक्त केली.
International Halal Show, scheduled to be held at Islam Gymkhana in Mumbai, cancelled: Details https://t.co/LjCDBXaQFD
— OpIndia.com (@OpIndia_com) November 8, 2022
१. मरिन लाईन्स येथील ‘इस्लामिक जिमखाना’ येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी ‘ब्लॉसम मिडिया’ने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
२. हलाल प्रमाणपत्राद्वारे मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे लक्षात आल्यावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने कार्यक्रमाला तीव्र विरोध केला.
३. ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड येथे ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली, तसेच बैठका घेण्यात आल्या.
४. कार्यक्रम झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करण्याची चेतावणी समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दिली होती. ‘हलाल शो इंडिया’ रहित व्हावा, यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस सहआयुक्त श्री. विश्वास नांगरे-पाटील आणि विशेष पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. शिवाजी पाटील यांची भेट घेतली. या वेळी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन ‘हलाल प्रमाणपत्रातून मिळणर्या पैशांचा वापर कुठे केला जातो ?, याची सखोल चौकशी करावी’, अशी मागणीही समितीने केली.
५. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आदी देशांत हलाल प्रमाणपत्र आणि हलाल वस्तू यांच्या विक्रीतून मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे उघड झाले आहे. त्याप्रमाणे भारतातही हलाल प्रमाणपत्र देणार्या ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ने मुंबईतील ‘२६/११’चा बाँबस्फोट, झवेरी बाजारातील साखळी बाँबस्फोट, देहलीतील जामा मशीदीमधील बाँबस्फोट, पुणे येथील जर्मन बेकरी बाँबस्फोट, वर्ष २००६ चा मालेगाव बाँबस्फोट, अहमदाबाद बाँबस्फोट आदी अनेक आतंकवादी कारवायांतील आरोपींना कायदेविषयक साहाय्य करत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘इंडियन मुजाहिदीन’, ‘इस्लामिक स्टेट’ अशा विविध आतंकवादी संघटनांशी संबंधित अनुमाने ७०० संशयित आरोपींच्या खटल्यांना आर्थिक साहाय्य केले जात आहे.
६. भारतात खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्रीय संस्था (‘एफ्.एस्.एस्.ए.आय्.’) आणि राज्याचे ‘अन्न आणि औषध प्रशासन’ (‘एफ्.डी.ए.’) विभाग असतांना हिंदूबहुल भारतात वेगळ्या हलाल प्रमाणपत्राची सक्ती कशासाठी ? त्यामुळे ‘हलाल उत्पादनां’चे उदात्तीकरण करणार्या कार्यक्रमांना पोलीस-प्रशासनाने अनुमतीच देऊ नये’, अशी मागणी हलाल सक्तीविरोधी कृती समितीच्या वतीने श्री. सुनील घनवट यांनी केली.
भारतातील हलाल प्रमाणीकरण बंद होईपर्यंत लढा चालूच राहील ! – सुनील घनवट, राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती
संपूर्ण महाराष्ट्रात मागील २ मास व्यापारी संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, खाटिक समाज, हलाल सक्तीविरोधी कृती समिती आदी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना मुंबईतील ‘हलाल शो’ रहित व्हावा, यासाठी संघटितपणे प्रयत्न करत होत्या. हा कार्यक्रम रहित होणे, हा हिंदूंच्या संघटित प्रतिकाराचा विजय आहे.
हलाल सक्ती विरोधी कृती समिती,
स्वा.सावरकर राष्ट्रीय स्मारक, बृहन्मुंबई हिंदू खाटीक संघ, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ,वज्रदल,@HinduJagrutiOrg व हिंदुत्ववादी संघटनांच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील 'इंटरनॅशनल हलाल शो' रहित..#Ban_HalalShow_AtMumbai@RanjitSavarkar @Ramesh_hjs pic.twitter.com/WL9E8zCPDY— Sunil Ghanwat (@SG_HJS) November 8, 2022
केवळ हा कार्यक्रम रहित व्हावा, यासाठी हे आंदोलन नव्हते. हा केवळ आरंभ आहे. संपूर्ण भारतातील ‘हलाल प्रमाणीकरण’ पद्धत बंद होईपर्यंत आमचा लढा चालूच राहील.
हिंदूंनी हलाल जिहादच्या विरोधातील लढाई यापुढेही नेटाने चालू ठेवावी ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
हा हिंदूंच्या एकजुटीचा विजय आहे; परंतु या यशावरच हिंदूंनी संतुष्ट रहाता कामा नये. हलालच्या माध्यमातून जिहादी अर्थकारण चालू आहे. त्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. कुराणमध्ये असे निर्देश नसतांना केवळ धार्मिक स्वातंत्र्य म्हणून हलालचा अट्टाहास होत असेल, तर हिंदूंनी याला विरोध केला पाहिजे. हलालचा पैसा जिहादकडे वळवला जात आहे. त्यामुळे हलाल विरोधातील ही लढाई हिंदूंनी यापुढेही नेटाने चालू ठेवणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाला अनुमती देणे शहाणपणाचे नाही ! – युसूफ अब्राहनी, अध्यक्ष, इस्लामिक जिमखाना, मुंबई
हे शहाणपण हिंदूंच्या विरोधापूर्वी का सुचले नाही !
काही संघटना ‘हलाल शो’ आयोजित करण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे आम्ही कायदा आणि सुव्यवस्था, शांतता अन् सौदार्ह यांसाठी हा कार्यक्रम रहित केला आहे. या कार्यक्रमाला अनुमती देणे शहाणपणाचे नाही.
हलाल प्रमाणपत्राच्या धोक्याविषयी जागृती करणे आवश्यक ! – विवेक घोलप, राष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय खाटिक समाज
हलाल प्रमाणपत्राचा विषय अतिशय गंभीर आहे. कुणीही राष्ट्रप्रेमी नागरिक हे सहन करणार नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेला समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणे हे देशविघातक आहे. त्यामुळे हिंदू याला विरोध करत आहेत. ‘हलाल शो’ रहित होणे, हा सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकत्रित कार्याचा परिणाम आहे. हलाल प्रमाणपत्राच्या धोक्याविषयी अधिकाधिक जागृती करणे आवश्यक आहे.
देशातील सर्व क्षेत्रांत ‘हलालीकरण’ करण्याचे ‘हलाल शो इंडिया’चे षड्यंत्र !
इस्लामिक जिमखाना येथे आयोजित केलेल्या जागतिक दर्जाच्या ‘हलाल शो इंडिया’मध्ये मुसलमानांना अनुकूल रुग्णालये, ‘हलाल ई-कॉमर्स’, हलाल पर्यटन, करमुक्त व्याज या सेवांसह खाद्यपदार्थांपासून ते सौंदर्य प्रसाधनांपर्यंत सर्व हलाल उत्पादनांमध्ये उपलब्ध होणार होती. १०० हून अधिक व्यावसायिक यामध्ये भाग घेणे अपेक्षित होते, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तावरून या जागतिक कार्यक्रमातून देशातील सर्व क्षेत्रांत हलाल प्रमाणपत्र आणण्याचे षड्यंत्र उघड होत आहे.
मुंबईतील हलालविरोधी आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !
संपूर्ण भारतात ‘हलालसक्ती’ बंद होईपर्यंत आंदोलन चालू ठेवू !मुंबई, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – संपूर्ण भारतात हलालसक्ती बंद होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवू, असा निर्धार मुंबईतील शीव (सायन) येथील आंदोलन हिंदुत्वनिष्ठांनी केला. १०० टक्के हलाल पदार्थांची विक्री करणार्या ‘मॅकडोनाल्ड’च्या शीव येथील दुकानापुढे ८ नोव्हेंबर या दिवशी हलाल सक्तीविरोधी कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. येथील वज्रदल संघटनेचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबई येथील ‘हलाल शो इंडिया’ या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ या आंदोलनात सहभागी झाले होते. |