५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बार्शी, सोलापूर येथील चि. कृष्णाली विशाल जाधव (वय ३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. कृष्णाली विशाल जाधव या पिढीतील आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
चि. कृष्णाली विशाल जाधव हिचा कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (२७ ऑक्टोबर २०२२) या दिवशी तिसरा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या नातेवाइकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. जन्मापूर्वी
१ अ. नामजप करणे आणि सत्संगाला जाणे : ‘मला विवाहाच्या आधी ‘धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, उपवास करणे, देवदर्शन करणे’ इत्यादी गोष्टींची आवड होती. विवाहानंतर सासरचे सर्व जण सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्याने मला साधनेचे महत्त्व समजले. तेव्हापासून ‘सनातनचे ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे, नामजप करणे, सत्संग ऐकणे’, अशा प्रकारच्या कृतींनी माझ्या साधनेला आरंभ झाला.
१ आ. एका तीर्थक्षेत्री गेल्यावर तेथील पुजार्यांनी ‘तुमच्या घरी लवकरच बाळ जन्माला येणार आहे’, असे सांगणे आणि त्यानंतर १५ दिवसांनी गरोदर असल्याचे समजणे : एकदा आम्ही सर्व कुटुंबीय दत्तगुरूंच्या दर्शनासाठी एका तीर्थक्षेत्री गेलो होतो. तेथे दर्शन घेऊन पूजा केल्यावर तेथील पुजार्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या घरी लवकरच बाळ जन्माला येणार आहे.’’ त्यानंतर पुढच्या १५ दिवसांत मी गरोदर असल्याचे समजले. तेव्हा माझ्याकडून गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
१ इ. सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे मी गरोदरपणात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि कुलदेवता यांचा नामजप केला, तसेच मी नियमितपणे श्रीरामरक्षास्तोत्र ऐकत असे अन् ग्रंथवाचन करत असे.
१ ई. गर्भारपणात पहिले ३ मास मला पुष्कळ त्रास होत होता, तरीही माझे मन आनंदी असायचे.
१ उ. मला तिसर्या मासात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा संगणकीय प्रणालीद्वारे पहाण्याची संधी मिळाली. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
– सौ. वेदिका विशाल जाधव (आई)
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते ६ मास
१. ‘कृष्णाली झोपल्यावर हातांच्या विविध मुद्रा करत असे.
२. ती झोपत असतांना श्रीरामरक्षास्तोत्र लावले की, ती लगेच झोपायची. ती रडत असतांना नामजप लावल्यावर ती शांत होत असे.
३. तिच्याकडे पाहिल्यावर शांत वाटायचे.
२ आ. ६ मास ते २ वर्षे
२ आ १. सहनशील : मी कृष्णालीला काविळीची लस द्यायला नेले. तेव्हा ती ‘इंजेक्शन’ देतांना जराही रडली नाही. तिचे कान टोचतांना ती आजीच्या मांडीवर शांतपणे बसून होती. तिचे कान टोचल्यावर तिच्या कानाच्या छिद्रातून रक्त आले; पण ती रडली नाही. ती रुग्णाईत झाल्यास त्रास देत नाही.
२ आ २. सात्त्विक गोष्टींची आवड : कृष्णाली ७ व्या मासात रांगायला लागली. एकदा आम्ही तिच्यासमोर दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि भ्रमणभाष या दोन वस्तू ठेवल्या. तेव्हा ती दैनिक ‘सनातन प्रभात’च्या दिशेने रांगत गेली.
२ आ ३. देवाची ओढ
अ. कृष्णालीला देवतांची सात्त्विक चित्रे आवडतात. ती देवतांच्या चित्रांसमोर डोके टेकवून नमस्कार करते.
आ. ती देवपूजा करत असतांना पूजा करणार्याच्या मांडीवर जाऊन बसते आणि देवपूजेची भांडी पुसून देते. ती ग्रंथांवरील देवतांच्या चित्रांकडे पाहून ‘जय बाप्पा’ असे म्हणते आणि त्या चित्रांना नमस्कार करते.
इ. ती झोपतांना श्रीरामाचा पाळणा लावायला सांगते.
२ आ ४. कृष्णालीला अत्तर आणि कापूर यांचे उपाय करायला आवडतात, तसेच ती इतरांनाही अत्तर आणि कापूर आणून देते.
२ आ ५. साधकांच्या सहवासात रहायला आवडणे : साधक घरी आल्यावर कृष्णालीला फार आनंद होतो. ती साधकांच्या घरी गेल्यावर त्यांच्या घरात मोकळेपणाने वावरते.
२ आ ६. कृष्णालीकडे पाहून आनंद जाणवतो.
३. कृष्णालीचे स्वभादोष
हट्टीपणा आणि राग येणे’
– श्री. विशाल आणि सौ. वेदिका जाधव (चि. कृष्णालीचे आई-वडील), श्री. नंदकुमार आणि सौ. गंगा जाधव (कृष्णालीचे आजी-आजोबा), बार्शी, जिल्हा सोलापूर. (१६.११.२०२१)