पू. पद्माकर होनप यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) आणि कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे
१. पू. वामन राजंदेकर यांना जाणवलेली सूत्रे
अ. ‘३१.१०.२०२२ या दिवशी पू. होनपकाकांच्या पार्थिवाचे दर्शन घेतांना पू. वामन प्रथमच असे दर्शन घेत असूनही ते घाबरले किंवा गोंधळले नाहीत.
आ. ते एकदम स्थिर होऊन पू. होनपकाकांच्या पार्थिवाकडे बघत होते.
इ. पू. वामन म्हणाले, ‘‘माझे मन पूर्ण निर्विचार झाले आणि पू. होनपआजोबांकडे पाहिल्यावर मला पुष्कळ शक्ती जाणवत होती. मला त्यांच्याभोवती गुलाबी रंगाची प्रभावळ दिसत होती.’’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
२. कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ११ वर्षे) फोंडा, गोवा.
अ. ‘पू. होनपआजोबांची आत्मज्योत प.पू. गुरुदेवांमध्ये (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये) विलीन झाली असून त्यांच्यात केवळ देहाचा भेद राहिला आहे’, असे मला जाणवले.
आ. माझे मन निर्विचार स्थितीत गेले आणि ध्यान लागल्यासारखे वाटले. नंतर माझे मन शांत झाले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ३१.१०.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |