गंभीर रुग्णाईत असतांनाही सदा आनंदी आणि साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची तळमळ असणारे पू. होनपकाका !
‘पू. होनपकाकांना आजारपणामुळे तीव्र वेदना आणि थकवा असायचा, तसेच रात्रभर झोप लागायची नाही. असे असतांनाही त्यांच्या मुखचर्येवर (चेहर्यावर) नेहमी आनंदच जाणवायचा. त्यांना कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नसायची. ही संतांची मोठी वैशिष्ट्ये त्यांच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवायची. त्यांची साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची प्रचंड तळमळ असायची. काही वेळा पुष्कळ थकवा आणि तोल जाण्याची स्थिती असतांनाही साधकांवरील प्रेमापोटी ते साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यासाठी येत असत. ते जेव्हा नामजपादी उपाय करण्यासाठी बसत असत, तेव्हा काही क्षणांतच ध्यानावस्थेत जात असत. ते भगवंताच्या नित्य अनुसंधानात रहात असल्यानेच त्यांना हे शक्य होत असे. पू. होनपकाकांसारखे संत आणि साधक आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर उपाय किंवा त्यांच्यासाठी नामजप करतात; म्हणून साधकांचे आध्यात्मिक त्रास अल्प होत आहेत. पू. होनपकाका आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी आम्ही सर्व साधक कृतज्ञ आहोत !’
– (पू.) संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (३०.१०.२०२२)
|