‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड’कडून लक्ष्मीपूजनाचे शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेला निमंत्रण !
संगणकीय प्रणालीद्वारे १०६ कुटुंबांनी घेतला लक्ष्मीपूजनाचा लाभ !
पुणे – रत्नागिरी जिल्ह्यातील ‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड, (डी.एस्.पी.पी.एल्.), भोरपवणे’ यांच्या वतीने २४ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्यामागील शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते. सनातन संस्थेच्या वतीने आधुनिक वैद्या ज्योती काळे यांनी लक्ष्मीपूजन करण्यामागील शास्त्र आणि दीपावली, तसेच अभ्यंगस्नान यांविषयीची शास्त्रीय माहिती सांगितली. श्री. विपुल मांडके यांनी विधीवत् लक्ष्मीपूजनाचे पौरोहित्य केले. या वेळी देवरुख आश्रम, तसेच डी.एस्.पी.पी.एल्.च्या देश-विदेशातील साधकांनी संगणकीय प्रणालीद्वारे याचा लाभ घेत शास्त्रोक्त लक्ष्मीपूजन केले. हा कार्यक्रम सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत हिंदी भाषेतून पार पडला. या वेळी देश विदेशातील १०६ साधक कुटुंबांनी याचा लाभ घेतला. पुणे येथील डी.एस्.पी.पी.एल्.चे साधक श्री. प्रांजल जोशी यांनी प्रास्ताविक केले.
डी.एस्.पी.पी.एल्. ही रेकी उपचारपद्धती शिकवणारी भारतातील एक प्रमुख संस्था आहे. येथे श्री. अजित तेलंगगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली देश-विदेशातील सहस्रो साधक रेकी शिकत आहेत. प्रत्येक १५ दिवसांनी घेण्यात येणार्या डी.एस्.पी.पी.एल्.च्या विशेष सत्संगात लक्ष्मीपूजनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
अभिप्राय
श्री. प्रांजल जोशी, साधक, डी.एस्.पी.पी.एल्. : इतर पुरोहित बर्याच वेळा पूजा गडबडीत उरकतात. सनातनच्या साधक पुरोहितांनी अतिशय शास्त्रोक्त आणि पुष्कळ भावपूर्ण पूजा सांगितली. त्यामुळे आम्हा सर्व साधकांना आनंद अनुभवता आला. याखेरीज दीपावली आणि त्याचे अध्यात्मिक महत्त्वही सर्वांना समजले. याबद्दल सनातन संस्थेचे आभार !