‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड
‘पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. ती मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला. तेव्हापासून शालेय पाठ्यपुस्तकांत अकबर, टिपू सुलतान आदी मुसलमान आक्रमकांचे धडे शिकवले जाऊ लागले, जे आजपर्यंत चालूच आहे. एकूणच ‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणक्षेत्राचे इस्लामीकरण चालू आहे. हा ‘शिक्षण जिहाद’च आहे. जोपर्यंत भारत घटनात्मक दृष्टीने हिंदु राष्ट्र बनत नाही, तोपर्यंत देशाच्या शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत इस्लामीकरण चालूच राहील.’