श्रीराममंदिर उभारणीसाठी काणकोण येथील पर्तगाळ मठाच्या वतीने १ कोटी ८ लाख रुपयांची देणगी
काणकोण, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – अयोध्येतील श्री राममंदिराच्या उभारणीसाठी पर्तगाळ, काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या वतीने १ कोटी ८ लाख ७७ सहस्र ७७७ रुपयांची देणगी देण्यात आली आहे. मठाधिपती श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी ही घोषणा केली. विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या आणि अयोध्येतून आलेल्या रामराज्य दिग्विजय रथयात्रेचे ५ नोव्हेंबर या दिवशी पर्तगाळ मठात आगमन झाले. याप्रसंगी मठाधिपती श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी ही घोषणा केली. या प्रसंगी रथयात्रेचे नेतृत्व करणारे प.पू. शक्ती शांतानंद महर्षी यांची वंदनीय उपस्थिती होती.