मुंबईच्या पोलीस सहआयुक्तांना निवेदन !
|
मुंबई – येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणारा ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित करण्याविषयी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी राठोड यांचीही भेट घेण्यात आली. त्यांनी ‘याविषयी माहिती घेऊन कार्यवाही करू’, असे सांगितले. या प्रसंगी अखिल भारतीय खाटिक समाजाचे राष्ट्रीय महासचिव श्री. विवेक घोलप, महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि समितीचे मुंबई समन्वयक बळवंत पाठक तसेच धर्मप्रेमी सर्वश्री श्रीनिवास अंबट, प्रदीप ओक आणि प्रदीप नलावडे उपस्थित होते.