इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनामध्ये आता तरुणी पाडत आहेत मौलानांच्या डोक्यावरील टोपी !
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि गळा झाकण्याचे वस्त्र)
(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)
तेहरान (इराण) – इराणमध्ये गेल्या २ मासांपासून हिजाबच्या विरोधात तेथील महिलांकडून आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन सरकारकडून चिरडण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
Iran Hijab Protest: Young Iranians Knock Turbans Off Clerics In Show Of Contempt, Defy Ultimatum.#TNDIGITALVIDEOS #Hijab #Iran pic.twitter.com/jOLowaApsX
— TIMES NOW (@TimesNow) November 2, 2022
आता या आंदोलनामध्ये एक वेगळा प्रयत्न केला जात आहे. येथील मुली, तरुणी आणि तरुण रस्त्यांवरून जाणार्या मौलानांच्या डोक्यावरील पगडी, टोपी आदी पाडून पळून जात आहेत. या संदर्भातील काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. काही ठिकाणी पडलेली पगडी, टोपी नंतर कचर्याच्या डब्यात फेकली जात आहे.