सुधीर सूरी यांची हत्या करणार्याला खलिस्तानी आतंकवादी संघटना १० लाख रुपये देणार
नवी देहली – अमृतसर (पंजाब) येथे शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची हत्या करणारा संदीप सिंह याला खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने १० लाख रुपए देण्याची घोषणा केली. या संघटनेचा अध्यक्ष असणारा आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने एक व्हिडिओ प्रसारित करून ही घोषणा केली. ‘हा पैसा सदीप याला कायदेशीर साहाय्य घेण्यासाठी उपयोगी पडेल’, असेही त्याने या व्हिडिओत सांगितले.
अमृतसर में हिंदू नेता की हत्या के बाद सिख फॉर जस्टिस ने आरोपी को 10 लाख रुपए देने का ऐलान किया https://t.co/a8w6azV2Rd #SudhirSuri
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) November 6, 2022
पन्नू याने यात पुढे म्हटले आहे की, २ टक्के शिखांना चिरडण्याची भाषा करणार्या हिंदु नेत्याला ठार मारणे चुकीचे नाही. यामुळेच संदीप याला न्याय देण्यासाठी त्याला आम्ही साहाय्य करणार आहोत. संदीप आतंकवादी नाही. त्याने सार्वजनिक ठिकाणी बाँब फोडलेला नाही. एखाद्या राजकीय व्यक्तीची हत्या करणे, याचा अर्थ आतंकवाद होत नाही.