देहलीतील जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार शेख याला पुन्हा अटक
नवी देहली – येथील जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार शेख याला पुन्हा अटक करण्यात आली. रोहिणी न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी अन्सार शेख याची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर त्याची जहांगीरपुरीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. काही लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. (पोलिसांनी अशांवरही कारवाई केली पाहिजे ! – संपादक) या स्वागताचा एक व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आला. यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी देहली पोलिसांनी अन्सार याच्यासह इतर ३ जणांना पुन्हा अटक करून कारागृहात टाकले.
Delhi: Jahangirpuri violence accused Ansar Sheikh, given bail two days ago, arrested again for jeopardising peace by instigating people https://t.co/RaJ7lUuvwV
— OpIndia.com (@OpIndia_com) November 7, 2022
देहलीतील जहांगीरपुरी येथे एप्रिल २०२२ मध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत हिंसाचार झाला होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदु भाविकांवर मशिदीच्या छतावरून दगडफेक करण्यात आली होती. आरोपी अन्सार आणि तबरेज हे या हिंसाचराचे सूत्रधार असल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले होते.