ग्रहणकाळात उपवास करण्यासंबंधीच्या लेखातील सूर्यास्तानंतर पाणी न पिण्याविषयीच्या सूत्रासंबंधी स्पष्टीकरण
‘५.११.२०२२ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ ५ वर प्रसिद्ध झालेल्या ‘धर्मानुसार आचरण केल्याने…’ या लेखासंबंधी अनेक वाचकांनी पुढील प्रश्न विचारला. लेखातील सूत्र ‘५’ मधील उपसूत्र ‘उ’ यामध्ये ‘ग्रहणाच्या पर्वकाळात, म्हणजे ८ नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून सायंकाळी ६.१९ वाजेपर्यंत, म्हणजे ग्रहण संपेपर्यंत पाणीही पिऊ नये,’ असे दिले आहे. तेथे ‘८ ऐवजी ७ नोव्हेंबर असे हवे का ?’, असे विचारले. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. ‘ग्रहणाचे वेध सूर्योदयापासून पाळावेत. वेधकाळात विनाअन्न उपवास करत असतांना पाणी प्यायल्यास चालते. ८ नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ग्रहण संपेपर्यंत, म्हणजे साधारण २० मिनिटांच्या काळात मात्र पाणीही पिऊ नये. त्यामुळे लेखात दिलेले सूत्र योग्य आहे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२२)