गुजरातनंतर आता हिमाचल प्रदेशातही समान नागरी कायदा लागू करण्याचे भाजपचे आश्वासन !
शिमला – सध्या गुजरातसमवेत हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने तो सत्तेत आला, तर समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन जनतेला दिले आहे. गुजरात राज्यात तर हा कायदा लागू करण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती काही दिवसांपूर्वी गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली होती. भाजपचे शासन असलेल्या बहुतांश राज्य सरकारांनी या कायद्याचे समर्थन केले आहे.
#HimachalPradeshelections2022: Government committed to implement #Uniformcivilcode, says CM #JairamThakur#HimachalElection2022 #HimachalElections https://t.co/QW9tkYGY7Q
— India TV (@indiatvnews) November 6, 2022
संपादकीय भूमिकाएकेका राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याऐवजी केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशातच तो लागू होण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असेच हिंदु राष्ट्रप्रेमींना वाटते ! |