‘जन गण मन’ आणि ‘वन्दे मातरम्’ यांना समान दर्जा असल्याने त्यांचा सन्मान करा ! – केंद्रशासन
नवी देहली – राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’ या दोघांनाही समान दर्जा असून देशातील प्रत्येक नागरिकाने दोघांचाही सन्मान करायला हवा, असे केंद्रशासनाने देहली उच्च न्यायालयात सांगितले. भाजपचे नेते अधिवक्ता श्री अश्विनी उपाध्याय यांच्या याचिकेवर उत्तर देतांना केंद्रशासनाने वरील भूमिका मांडली.
The Centre has told the #DelhiHighCourt that the national anthem ‘Jana Gana Mana’ and the national song ‘Vande Mataram’ “stand on the same level” and citizens should show equal respect to both. #Patriotic #VandeMataram #NationalAnthem #JanaManaGanahttps://t.co/llglnd7HrD
— The Telegraph (@ttindia) November 5, 2022
अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेत म्हटले आहे की, राष्ट्रगीताप्रमाणेच राष्ट्रीय गीत ‘वन्दे मातरम्’साठीही दिशानिर्देश सिद्ध करण्यात यावेत. शैक्षणिक संस्थांमध्ये प्रतिदिन वन्दे मातरम् म्हणणे अनिवार्य करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य शासन यांना देण्यात यावेत, अशी मागणी यात करण्यात आली आहे.