हिंदूंच्या सामूहिक धर्मांतराच्या प्रकरणी फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे पादर्यासह १० ख्रिस्त्यांना अटक !
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – काही मासांपूर्वी हिंदूंच्या करण्यात आलेल्या सामूहिक धर्मांतराच्या प्रकरणी एका पादर्यासह १० ख्रिस्त्यांना अटक करण्यात आली आहे. १४ एप्रिल २०२२ या दिवशी येथील हरिहरगंजमधील चर्चमध्ये ५० हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रकरणी पोलिसांनी ५५ लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यांपैकी २६ जणांना अटकही करण्यात आली होती. तथापि पुराव्यांअभावी त्या सर्वांना तेव्हा सोडावे लागले होते.
चर्च में 70 लोग, जिनमें 50 हिन्दू समाज के… फतेहपुर में चल रहा था ईसाई धर्मांतरण का खेल, यूपी पुलिस ने पादरी सहित 10 को किया गिरफ्तार#Fatehpur #Christian #Conversionhttps://t.co/DvXrV9foU0
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 5, 2022
आता मात्र पोलिसांनी धर्मांतराचा मुख्य सूत्रधार असलेल्या पादर्यासह १० लोकांना अटक केली आहे. अन्य आरोपींच्याही विरोधात कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार फतेहपूर जिल्ह्यातील ललौली क्षेत्रामधील चर्चमध्ये एप्रिल २०२२ प्रमाणेच एका प्रार्थनासभेचे आयोजन करून हिंदूंच्या धर्मांतराचा घाट घालण्यात आला होता. यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून झालेल्या विरोधानंतर पोलिसांनी ५ लोकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला हेता. यानंतर पोलिसांनी दोन ठिकाणांहून १० लोकांना अटक केली आहे. या प्रकरणी एकूण अटक करण्यात आलेल्या लोकांची संख्या १६ झाली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या सातत्याने होत असलेल्या धर्मांतरावरून ख्रिस्त्यांचा हिंदुविरोधी कुटील डावच लक्षात येतो. अर्थात् हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच ख्रिस्त्यांचे फावते, हेही खरे ! |