शेतकर्यांना दिवसा १२ घंटे वीज देण्याचा प्रयत्न ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – शासन शेतकर्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणार्या काळात शेतकर्यांना विजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी विजेचे सर्व ‘फीडर’ (फीडर म्हणजे विजेचा मुख्य पुरवठा केला जाणारी वाहिनी) सौर उर्जेवर आणणार आहे. यातून ४ सहस्र मेगावॅट विजेचे उद्दिष्ट ठेवले असून यातून येत्या काळात शेतकर्यांना १२ घंटे वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बार्शी येथे विविध विकासकामांच्या ‘ऑनलाईन’ लोकार्पण आणि भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.
शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://t.co/kbvsGPvhZE
— DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR (@InfoPalghar) November 4, 2022
या वेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘‘सोलर फीडरसाठी शेतकर्यांची भूमी हेक्टरी ७५ सहस्र रुपये भाड्याने घेणार असून यातून शेतकर्यांना शाश्वत भाडे मिळेल, तसेच ३० वर्षांनी भूमी परत दिली जाईल. यामुळे शेतकर्यांच्या जीवनात परिवर्तन घडणार आहे.’’