मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील २९ साक्षीदारांना एन्.आय.ए. न्यायालयाने फितूर घोषित केले !
मुंबई – येथील सत्र न्यायालयातील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) विशेष न्यायालयात वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील २९ साक्षीदार न्यायालयाने ५ नोव्हेंबर या दिवशी फितूर म्हणून घोषित केले आहेत. या प्रकरणातील आरोपी प्रसाद पुरोहित आणि आरोपी सुधाकर चतुर्वेदी यांच्या संबंधित साक्षीदार क्रमांक २८२ फितूर म्हणून न्यायालयाने घोषित केले आहेत. आता या प्रकरणात १०५ साक्षीदारांची जबाब नोंदणी अद्याप बाकी आहे.
मालेगांव बम धमाके में अब तक कुल 220 गवाहों के बयान दर्ज किए जा चुके हैं. आज 29वां गवाह अपने बयान से मुकर चुका है. इस मामले में अब महज 105 गवाह बचे हैं. @surajojhaa की रिपोर्ट #MalegaonBlastCase #Mumbai #NIA https://t.co/R7ADOIcJaK
— ABP News (@ABPNews) November 5, 2022
आरोपी प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्या संदर्भातील ‘एन्.आय.ए.’च्या न्यायालयात साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला होता. आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) या संबंधित साक्षीदारांचा जबाब नोंदवला होता. साक्षीदाराने ‘कुठल्याही प्रकारचा मी जबाब दिलेला नाही, तसेच स्वाक्षरीही केलेली नाही. आरोपींना ओळखण्यापासूनही नकार दिला आहे’, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात २९ साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित केले आहे.