साधकांनो, सध्या होणार्या विविध त्रासांवर मात करण्यासाठी स्वतःची साधना वाढवा !
‘सध्या अनेक साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. त्रासांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे हे प्रमाण आपत्काळ समीप आल्याचे दर्शवत आहे. ‘या आपत्काळातून तरून जाण्यासाठी स्वतःची साधना वाढवणे, हाच एकमेव पर्याय आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे. सर्वांनी दिवसभरातील अधिकाधिक वेळ सत्सेवेत रहाण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यष्टी साधनेचे, विशेषतः ‘भावजागृतीचे प्रयत्न कसे होतील ?’, याकडेही अधिक लक्ष द्यावे.’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |