सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत
सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. ५ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांना प.पू. डॉक्टरांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये’ यातील काही भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
(ही मुलाखत सद्गुरु डॉ. वसंत आठवले आणि पू. शिवाजी वटकर संत होण्यापूर्वीची असल्याने या लेखमालेतील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही. – संपादक)
भाग १ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/625509.html
५. प.पू. डॉक्टरांची आध्यात्मिक गुरु म्हणून आढळलेली वैशिष्ट्ये
५ घ. प.पू. डॉक्टरांच्या संकल्पाने कार्यपूर्ती होणे : प.पू. डॉक्टरांच्या मनात एखाद्या कार्याविषयी विचार आल्यावर तो संकल्प बनून त्यासाठी लागणारा पैसा, मनुष्यबळ इत्यादी सर्व नियोजन आपोआप होऊन कार्यपूर्ती होते.
५ च. ‘मानव आणि विश्व यांच्या कल्याणासाठी हिंदु धर्मच उपयोगी आहे’, हे पटवून देणे : प.पू. डॉक्टरांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि त्याची वैशिष्ट्ये सांगून ‘मानव आणि विश्व यांच्या कल्याणासाठी हिंदु धर्मच उपयोगी आहे’, हे पटवून दिले आहे.
५ छ. प.पू. डॉक्टरांनी निर्मिलेल्या ग्रंथांत वेदाप्रमाणे सामर्थ्य असणे : प.पू. डॉक्टरांनी निर्मिलेल्या ग्रंथांत पुष्कळ नवीन ज्ञान असून त्या सर्व ग्रंथांचे मिळून ‘५ वा वेद’, असे नामकरण होईल. (‘सनातनच्या सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानात ‘सनातन संस्थेचे ग्रंथ हे कलियुगातील पाचवा वेद आहेत’, असा उल्लेख आला आहे. त्याचप्रमाणे महर्षींनी प.पू. डॉ. आठवले संकलित सनातनच्या ग्रंथांना ‘ॐकार वेद’, असे संबोधले आहे.’ – संकलक)
५ ज. विश्वातील सर्व लोकांचे सखोल शास्त्रीय ज्ञान प.पू. डॉक्टरांनी मिळवणे : विश्वातील १४ लोक, म्हणजे भूलोक, भुवर्लाेक, स्वर्गलोक, महर्लाेक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, हे सप्तलोक आणि सप्तपाताळ यांचे सखोल शास्त्रीय ज्ञान, म्हणजे आतापर्यंत इतर कुठेही उपलब्ध नसलेले ज्ञान प.पू. डॉक्टरांनी मिळवलेले आहे.
५ झ. ‘आपण जे कर्म करतो किंवा ज्या कलेची साधना करतो, त्यातून ईश्वरप्राप्ती कशी करावी ?’, याचे गूढ प.पू. डॉक्टरांनी विशद केले आहे.
५ ट. वाईट शक्ती, त्यांचे प्रकार आणि त्यांवरील उपाय यांचे सखोल ज्ञान उपलब्ध करून देणे : वाईट शक्ती, भुते, मांत्रिक आणि त्यांवरील उपाय इत्यादींचे सखोल आणि आतापर्यंत उपलब्ध नसलेले जिज्ञासा पूर्ण करणारे ग्रंथ केवळ सनातन संस्थेचेच असणार आहेत.
(‘सनातन संस्थेने वाईट शक्तींच्या त्रासावर उपाय सांगणारे पुढील ४ ग्रंथ आणि १ लघुग्रंथ प्रकाशित केले आहेत.)
१. मीठ-मोहरी, नारळ, तुरटी आदींनी दृष्ट कशी काढावी ?
२. कापूर, काळे उडीद, विड्याचे पान आदींनी दृष्ट कशी काढावी ?
३. उतारा आणि मानस दृष्ट
४. वाईट शक्तींमुळे जीवनात होणार्या त्रासांपासून रक्षण करण्याचे उपाय ! (वास्तू आणि वाहन शुद्धी यांसह) (भाग १)
५. आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन (लघुग्रंथ)
(वर्ष २०१०) (क्रमशः उद्याच्या अंकात)
|